shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनशरद कृषी महोत्सव २०२२ चा आज प्रारंभ..

खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
शरद कृषी महोत्सव २०२२ चा आज  प्रारंभ.. 

आमदार दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

इंदापूर येथे भव्य कृषी प्रदर्शन,  महिला व शेतकरी मेळावा आणि  युवा महोत्सवाचे आयोजन.

इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  आ. दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख  मार्गदर्शनाखाली इंदापूर मध्ये आज गुरुवार (ता.८) रोजी शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन १२ तारखेपर्यंत चालणार असून या काळात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
     इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ' शरद कृषी महोत्सव २०२२' इंदापूर शहरातील नवीन तहसील कचेरी शेजारील प्रांगणात आयोजित केला आहे.यामध्ये शेतकरी,महिला, युवक यांच्यासाठी महोत्सव वरदान ठरणारा असणार आहे. या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात तब्बल २०० प्रकारचे विविध स्टॉल्स असणार आहेत. महाराष्ट्रातील नामांकित कृषी कंपन्या सहभागी होणार आहेत.विविध पिकाच्या वाढीसाठी, परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन केले आहे.यामध्ये नामांकित वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
     या मोहत्सवाचे उद्घाटन गुरुवारी ५ वाजता  माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.तर शुक्रवारी सकाळी ११ वाजता. खास महिलांसाठी खेळ पैठणीचा व महिला मेळावा होणार आहे या कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर या उपस्थित राहणार आहेत.  शनिवार रोजी सकाळी ११ वाजता खा. अमोल कोल्हे, दत्तात्रय भरणे व आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत युवक मेळावा होणार आहे. तर रविवारी सायंकाळी ५ वाजता शेतकरी मेळावा व १२ डिसेंबर रोजी पाच वाजता या कृषी महोत्सवाचा समारोप होणार आहे. या महोत्सवाचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांनी केले आहे.
close