shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देसाई विद्यालय बेलवाडी येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी .

देसाई विद्यालय बेलवाडी येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी .
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ३ जानेवारी देसाई विद्यालय बेलवाडी येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सौ. शेळके मॅडम व सौ जामदार मॅडम तसेच ५ वी ते १० वी च्या प्रतिनिधि मुलींनी प्रतिमेचे पुजन केले.  शिक्षकेत्तर कर्मचारी  प्राण लोंढे यांचा वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेटचे वाटप केले.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक भालचंद्र निंबाळकर सर यांनी यांनी चव्हाण सर यांची छत्रपती हायस्कूल काटेवाडी या ठिकाणी बदली झाल्याने त्यांची शाल व श्रीफळ देऊन निरोप समारंभ संपन्न केला . 
 तसेच प्राण लोंढे यांचा वाढदिवस निमित्त शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जामदार सर यांनी केले     
close