*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर महाविद्यालयाचा विद्यार्थी तेजस शिंदेचा सत्कार*
इंदापूर प्रतिनीधी:कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूरचा विद्यार्थी तेजस शिंदे याने बॉडी बिल्डिंग व वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एका विशेष समारंभमध्ये त्याचा सत्कार करून सन्मान केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे ,डॉ. शिवाजी वीर आणि राजकुमार जाधव उपस्थित होते.

