महात्माफुलेनगर (बिजवडी) येथे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कोपीवरची भरली शाळा.
कोपीवरचीशाळेत ४० मुले झाले उपस्थित .
इंदापूर प्रतिनिधी: शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने ऊसतोड मजुरांसाठी फिरता दवाखान्या मार्फत आरोग्य सेवा दिली जात असताना महात्माफुलेनगर बिजवडी येथे ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपी वरची शाळा ६ जानेवारी रोजी सुरू करण्यात आली.
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर ऊसतोड मजुरांसाठी फिरता दवाखान्या मार्फत दि. ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मोफत आरोग्य तपासणी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्माफुलेनगर कारखान्याच्या परिसरातील मजूर वसाहतीमध्ये करण्यात आली.
तसेच शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कोपीवरची शाळेचा उद्घाटन कर्मयोगी चे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे शेतकी अधिकारी किशोर हिंगमिरे , कर्मयोगीचे ओ .एस. काळे , कर्मयोगी चे कर्मचारी, शिवाजी तरंगे , नवनाथ व्यवहारे . देवळे , शिंदे , इंदापूर वरून उपक्रमास भेट देण्यासाठी राकेश फडतरे, ॲड. शहा ,शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे एडमिनर दीपक जगताप, आदित्य राखुंडे,
केंद्राचे डॉक्टर निलेश कुमार , नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण, कोपीवरची शाळेचे प्रमुख भारत बोराटे , संजय शेलार वॉर्ड बॉय अकतर शेख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कोपीवरची शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ८५ ऊसतोड मंजूराची आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच शाळेसाठी ४० मुले उपस्थित होती. पहिल्या दिवसा मध्ये हे प्रमाण मोठे होते.या साठी दोन्ही ही चव्हाण मॅडमे यांनी परिश्रम घेतली.

