shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नालेगाव देवांग कोष्टी मंडळाकडून चौण्डेश्वरी मातेचा महाअभिषेक उत्साहात संपन्न ...


चौण्डेश्वरी भजनी मंडळाने केले सुश्राव्य भजन

प्रतिनिधी : सचिन गांधी

नगर : ८ /  श्री.देवांग कोष्टी पंच मंडळ आणि श्री. देवांग कोष्टी महिला उत्सव समिती मंडळ नालेगांव कुंभारगल्ली, अ.नगर यांचे मार्फत शुक्रवार दि .६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजता चौण्डेश्वरी मातेचा अभिषेक तसेच  सत्यनारायण महापुजेचे आयोजन  मोठ्या उत्साहात संपन्न झाले .

चौण्डेश्वरी भजनी मंडळाचा भजनी कार्यक्रम शनिवार  दि . ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता करण्यात आला तसेच दि .८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भव्य मिरवणूक व रथ यात्रा काढण्यात आली .

 मंदिरात सकाळी ११ वाजता चौण्डेश्वरी मातेची महाआरती करण्यात आली . तसेच महाआरती नंतर दुपारी १२:०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली असे आयोजकांनी सांगितले .

यावेळी अध्यक्ष प्रफुल्ल लाटणे मो. नं . .9890933280 यांनी सर्व समाज बांधवांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी व सभा मंडपा साठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले आहे .

यावेळी अध्यक्ष श्री प्रफुल्ल लाटणे , उपाध्यक्ष श्री रुपेश मुकोटे ,सचिव श्री अशोक फलके ,खजिनदार श्री संजय भंडारी , सभासद सागर दळवे, विनायक गुरसाळी ,अभय खराडे , तेजस खराडे , निल खराडे , देवांश खराडे ,नितेश वराडे, संतोष टेके, गणेश कांबळे, प्रमोद खारगे, उमेश टेके, गणेश लाटणे, सिद्धार्थ लाटणे , राहूल लाटणे , बाळासाहेब पाखले, रेवणनाथ पर्वते ,सुरेंद्र असलकर, रवींद्र टकले, सचिन महादर, विजय खटावकर, रवींद्र पाखले, सागर निपसे, अमित पाखले,शुभम तारळकर तसेच महिला उत्सव समितीचे पूजा दळवे, जयश्री लाटणे, रुपाली मुकोटे , सुनीता टेके, सुप्रिया पाखले, सुनीता लोटके, उज्वला टकले, ज्योती लाटणे ,अश्विनी खराडे आदी समस्त देवांग कोष्टी समाजाचे नागरिक उपस्थित होते .
close