प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २४ / चास येथील सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ तंत्रनिकेतनमध्ये दि. २३ जानेवारी २०२३ रोजी स्वराज्य संकल्पक महाराजा शहाजीराजे भोसले यांची पुण्यतिथी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध आडसूळ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक आदर्श नेतृत्व होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून देशाला एक नवीन प्रेरणा दिली.तसेच स्वराज्य संकल्पक महाराजा शहाजीराजे भोसले यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. अन्यायातून, गुलामगिरीतून मुक्त करण्याची शिकवण शिवबांना महाराजा शहाजीराजांनीच दिली. त्यांच्या विचारांवर एक स्वराज्य निर्माण झाले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर.एस. गडाख, सिव्हील विभागाचे प्रा. म्हस्के ए.ए., इलेक्ट्रॉनिक विभागातील प्रा.पाळंदे एस.सी. , इलेक्ट्रिकल विभागाचे प्रा. खेसे एस.बी., प्रा. पवळे एस.एस., संगणक विभाग प्रमुख प्रा. होले पी.पी. , प्रा. पालवे पी.बी., यंत्र विभागाचे प्रा. भुतकर टी. वाय. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते

