shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगाव कृ.ऊ.बाजार समितीतर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार..!!

हिंगोल/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.६,दर्पण दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पत्रकारांचा सत्कार करीत शुभेच्छा देण्यात आल्या.

वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र दि.६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केल्याने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करतात.निरपेक्ष भावनेने नि:पक्षपातीपणे सत्य व न्यायाची बाजु घेऊन सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारे पत्रकार बांधव असतात.लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून पत्रकाराकडे बघीतले जाते.याच अनुषंगाने सेनगाव बाजार समितीतर्फे पत्रकार केशव भालेराव,विश्वनाथ देशमुख,अशोक वाकळे आदी  पत्रकांराचा सत्कार करण्यात आला.यावेळी समितीचे निरीक्षक आर.आर.पतंगे,एल.बी.पतंगे,विलास नरवाडे,शिवाजी बुळे,विलास नरवाडे,कोरडे,शिवाजी तिडके,मुकेश देशमुख आदीसह समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
close