shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

किरण काळे युवा मंचच्या वतीने पळसदेव येथे ऊसतोड मजुरांना तिळगुळ वाटप*

*किरण काळे युवा मंचच्या वतीने पळसदेव येथे ऊसतोड मजुरांना तिळगुळ वाटप*
इंदापूर प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव किरण काळे आणि त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते अंबादास भिसे आणि युवा उद्योजक दिलीप अडवाल हे दरवर्षी मकर संक्रांती, दिवाळी भाऊबीज आणि रक्षाबंधन हे तीन सण ऊसतोड मजूर कुटुंबीयांसोबत साजरा करीत असतात. किरण काळे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. 

यावर्षी देखील मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील पळसदेव मधील काळेवाडी येथे काम करीत असलेल्या असंघटीत ऊसतोड मजुरांच्या वस्तीला इंदापूर भाजपचे युवा नेते किरणभाऊ काळे आणि त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते अंबादास भिसे आणि युवा उद्योजक दिलीप अडवाल यांनी दि.१५ जानेवारी २०२३ रोजी सदिच्छा भेट दिली आणि त्याचबरोबर सर्व ऊसतोड मजुरांची मुले, महिला, पुरुष तसेच सर्व ऊसतोड मजुर कुटुंबियांना तिळगुळाचे वाटप केले आणि सर्व ऊसतोड मजुरांना मकर संक्रांती सणाच्या शुभेच्छा दिल्या... 

close