चौण्डेश्वरी भजनी मंडळ करणार सुश्राव्य भजन
प्रतिनिधी : सुनिल ससाणे ,संजय वायकर
नगर : २ / श्री.देवांग कोष्टी पंच मंडळ आणि श्री. देवांग कोष्टी महिला उत्सव समिती मंडळ नालेगांव कुंभारगल्ली, अ.नगर यांचे मार्फत शुक्रवार दि .६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजता चौण्डेश्वरी मातेचा अभिषेक तसेच सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले .
यावेळी चौण्डेश्वरी भजनी मंडळाचा भजनी कार्यक्रम शनिवार दि . ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता होणार असून रविवार दि .८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भव्य मिरवणूक व रथ यात्रा काढण्यात येणार आहे .
मिरवणुकी नंतर मंदिरात सकाळी ११ वाजता चौण्डेश्वरी मातेची महाआरती होणार आहे . तसेच महाआरती नंतर दुपारी १२:०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवारासह कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांनी सांगितले आहे .

