shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथील महिला शेतकरी सौ.चंद्रभागा महादेव काळे यांना दौंड कृषी महोत्सवात कृषिभूषण पुरस्कार प्रदान .

बावडा येथील महिला शेतकरी सौ.चंद्रभागा महादेव काळे यांना दौंड कृषी महोत्सवात कृषिभूषण पुरस्कार प्रदान .
इंदापूर प्रतिनिधी:केंद्रीय मंत्री .राजकुमार चाहर यांच्या हस्ते दौंड येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय 2023 च्या  कृषि महोत्सवात बावडा येथील महिला शेतकरी सौ.चंद्रभागा महादेव काळे यांना कृषिभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 
भारतीय जनता पक्षांतर्गत पुणे जिल्हा किसान मोर्चा व दौंड तालुका कृषि उत्पादक सहकारी संस्था आयोजित जानेवारी 2023 च्या कृषि प्रदर्शनात शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत  माहितीचा अवलंब करून विविध पीकात किमान खर्चात कमाल उत्पादन काढणार्या निवडक पंधरा शेतकर्यांना जिल्हा स्तरावरील कृषिभूषण पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले .या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री . चंद्रकांत पाटील,माजी मंत्री . राम शिंदे,आमदार .राहुल कुल ,जिल्हा किसान मोर्चाचे प्रमुख .वासुदेव नाना काळे हे वअन्य मान्यवर उपस्थित होते.
 ड्रॅगन फ्रुट या पीकात केवळ साठ हजार रूपये उत्पादन खर्चात एका वर्षात सहा लाख रूपये उत्पादन काढणार्या प्रयोगशील महीला शेतकरी सौ.चंद्रभागा महादेव काळे यांना कृषिभूषण पुरस्कार केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी   प्रत्यक्ष पीक व्यवस्थापन पाहणारा  मुलगा सचिन काळे उपस्थित होता.
.सचिन काळे या पीकाबाबत माहिती देतांना म्हणाला,स्लरी व सेंद्रिय खतांच्या मात्रेमुळे आम्हाला दर्जेदार फळे काढता आली.यासाठी आम्हाला मंडल कृषि अधिकारी .गणेश सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष प्लाटवर येऊन मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी किसान डे निमीत्ताने बावडा येथील शेतकरी संघर्ष समितीने आमच्या प्रयत्नांची दखल घेऊन यथोचित सत्कार केला आहे. या पुरस्कार प्राप्तीबद्दल शेतकरी संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रा.पंडितराव पाटील यांनी काळे कुटूंबीयांचे अभिनंदन केले.


close