shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत स्वामी "विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती " निमित्त" मोफत आरोग्य शिबिराचे "आयोजन!"

भोसरी ! प्रतिनिधी :-

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण व्हावी, पालकांकडून विद्यार्थ्यांचे आरोग्य विषयक समस्या समजाव्यात, विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्यांवर मार्गदर्शन व औषध उपचार मिळावेत, विद्यार्थ्यांना मध्ये आहारविषयक व स्वच्छतेबाबत जाणीव जागृती व्हावी, या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        गुरुवार दिनांक १२ जानेवारी 2023 रोजी सकाळी ९:०० ते १:०० यावेळी "स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती"निमित्त "मोफतआरोग्य तपासणी शिबिराचे " आयोजन शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्यासाठी करण्यात आले होते.
         आरोग्य शिबिराचे उद्घाटन: आरोग्य शिबिराचे उद्घाटन विद्यार्थीचे पालक मा.श्री. मिनीनाथ सस्ते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
        उद्घाटन प्रसंगी लिटिल पेटल्स हॉस्पिटलचे डॉक्टर ज्योती लोंढे (सोनवणे) आर. के. मेडिकल चे राहुल काळे, नारायण हट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.संदीप बेंडुरे, सचिव प्रा. डॉ बाळासाहेब माशेरे, रोहिदास गैंद, शिवराम काळे, अंकुशराव गोरडे, शाळेतील सर्व स्टाफ उपस्थित होते.
        नारायण हट शिक्षण संस्था आणि लिटिल पेटल्स हॉस्पिटल भोसरी, आर .के .मेडिकल भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

       शाळेतील एकूण शंभर विद्यार्थ्यां (१००)व त्यांच्या समवेत आलेल्या पालकांची आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, व इतर तपासण्या करण्यात येऊन आरोग्य विषयक सल्ला व औषध उपचार करण्यात आले.
         आरोग्य शिबिरासाठी श्री. आकाश लोखंडे, धर्मेंद्र चव्हाण, सरवर खान,शिल्पा शिंदे, निशा पाटील, नीलम जगताप, आयशा पटेल, मनीषा वाकचौरे, यांनी संयोजनांस सहकार्य केले.
         शिबिराची यशस्वीते साठी शाळेच्या प्राचार्या विजया चौगुले, मालती माने, मीनल पाटील, प्रतिभा तांबे, सायली संत, प्रवीण भाकड, अश्विनी वायकर, सुरेखा मुके यांनी प्रयत्न केले.
      नारायण हट शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी व समाजासाठी नाविन्यपूर्ण असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे शाळा समाज व विद्यार्थी विकासाचे केंद्र बनत असून शाळेचा नावलौकिक सर्वत्र वाढत आहे.
      विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन केल्यामुळे शाळेचे पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
close