shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आनंदाचे चित्र

स्वत: रंगहीन,तरीही सारी सृष्टी रंगविण्याचे सामर्थ्य असणऱ्या वरुण राजाचं आणि आपलं एक वेगळंच नातं असतं, प्रत्येकाचाच हा जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येक कलाकार आपआपल्यापरीनं आपल्या कलेत या वरुण राजाला रंगवत असतो,आणि का रंगवू नये, तर रंगवलंच पाहिजे. त्याच्यशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.साऱ्यांनाच पहिल्या पावसाची ओढ,उत्सुकता,पण मला शेवटच्या दिवसांमधल्या पावसाचं जरा जास्तच अप्रुप वाटतं. पहिला पाऊस, पहिल्या पावसाच्या आठवणी,पहिलं प्रेम  याबद्दल आपल्या मनात एक हळवा कप्पा ,आठवणीचा ठेवा असतोच. मला न शेवटच्या पावसाबद्दल फार उत्सुकता ,ओढ वाटते.कारण पहिला पाऊस येतो तेव्हा आपल्याला खात्री असते. आता पावसात आणि आपल्यात विरह नसणार पण शेवटच्या दिवसांच्या पावसाचं महत्त्व मला खूप जास्त वाटतं, कारण नंतर त्याच्यात आणि माझ्यात अनेक महिन्यांचं अंतर येणार हे मला माहीत असतं म्हणून मला तो पाऊस मला डोळे भरून पाहायचा असतो आणि मनात साठवायचा असतो.एखादी गोष्ट आपल्या पासून लांब गेली की त्याचे महत्त्व कळतं असं म्हणतात.
खरंच आहे ते .या पावसात प्रवास करताना, एक लहान मुलगी अनवाणी पायांनी चित्रांची पुस्तके विकताना मी पाहिली.पण एक खारीचा वाटा म्हणून मी ती पुस्तके विकत घेतली. 

आणि तिला आर्थिक सहाय्य म्हणून मी ती पुस्तकं विकत घेतली.सांगायचं तात्पर्य इतकंच की ही मुले इतकी आनंदात रस्त्यावर राहतात तर मग आपण कीती दुखांना कवटाळून जगत असतो, यांना आनंदात राहायला येतं तर आपण किती क्षितीजाच्या शोधात धावत असतो.मान्य आहे भौतिक सुख म्हणजे सारी सुखं नव्हे पण अशा मुलांकडे बघुन वाटतं की समाधानाने आयुष्य जगावे.

या पावसाचाच आणखी एक अनुभव सांगावासा वाटतो. प्रवासात एक शाळा मी रोज पाहाते.ती शाळा गतिमंद मुलांची आहे.आई खूप मायेने त्या आपल्या मुलाला शाळेत नेताना मी पाहते,मात्रृत्व तर  अनंताच्या पलीकडे असं दान आहेच, पण या मातांकडे किती साकारात्मकता असते,जगात अशी कित्येक मुलं आहेत, कुणाकडे डोळे नाहीत, कुणी कर्णबधिर,कुणी अपंग परंतू त्यांची माता किंवा ते कधीच तक्रार करत नाहीत किंवा आयुष्याला कंटाळत नाही. त्यांच्याकडे बघुन एक प्रेरणा   मिळते.जगण्याची उमेद मिळते. मी शाळेत असताना गतिमंद शाळेच्या संचालिका शोभा नाखरे  म्हणाल्या होत्या,तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुमचे अवयव तुमची साथ देतात.

आयुष्याचे महत्त्व हे एखाद्या शेवटच्या टप्प्यात कॅन्सर झालेला माणसाला विचारावं,पावसाचे महत्त्व,हे एखाद्या विदर्भातील, मराठवाड्यातील माणसाला विचारावं.आपल्या रोजच्या जीवनात चहाचंच उदाहरण घेवू...
कधी कधी आपला चहा संपल्यावर आपल्या लक्षात येतं की साखर तर तळालाच राहिली आयुष्यही हे असंच आहे.यांत आनंद आपणच मिसळवायच असतो. मृत्यू हा अटळ आहे मग जगून मरायला काय हरकत आहे. आयुष्य हे सुंदर आहे, फक्त आपल्याला ते रंगवता आलं पाहिजे.

सांगण्याचं तात्पर्य इतकंच की मी सुरवातीला म्हटलं की, प्रत्येक कलाकार पावसाला आपल्या कलेत आपआपल्या परीनं रंगवत असतो.आयुष्यातही असचं आहे   आपलं आयुष्य आपल्यालाच रंगवायचं असतं.आयुष्य हा ऊनपावसाचा खेळ आहे असं म्हणतात.यात सामाधान नावाची छत्री घेऊन जगायला काय हरकत आहे.आनंदाचा पाऊस आला की  ही छत्री सारू की बाजूला अन् मनसोक्त भिजावे, मला माहीत आहे की मानसिक सूखं ही खूप महत्त्वाच असते.कधी कधी परीस्थिती,काही माणसांच वागणं आपल्या हातात नसतं,पण मग अशी परीस्थिती अशा माणसांमध्ये गुंतुच नये ना,आणि कणखरपणे सावधानतेने जगले पाहीजे हे इतरांच्या अनुभवातून, आपल्या अनुभवातून आणि पुस्तकांतून शिकता येते हे मला फार उशिरा कळलं.
जे निघून गेलेलं ते आपलं कधी नव्हतच असं समजून जे आपल्याजवळ आहे त्यांचं  महत्त्व समजून घेतलं तर सारंच सोपं होईल. 

माझ्या आकलनशक्ती नुसार जगणं काय असतं ते शब्दबध्द करण्याचा हा प्रयत्न.आंनदाची साखर ही आपल्या जवळच असते बस तीला जीवनात मिसळून जीवन जगल्यास नक्की जीवन जगणे सार्थक ठरु शकेल असे मला तरी वाटते.

कु.श्रृती रसाळ - मुंबई


close