शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२३
कृषिकन्या आणि जि.प.प्रा.शाळा खडांबे खु यांच्या सहभागातून' शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..!!
शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी जि.प.प्रा.शाळा खडांबे खु...!!
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगावच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व विस्तार शिक्षण विभाग अंतर्गत १९ फेब्रुवारी शिवजयंती चा कार्यक्रम खडांबे खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आला.
सरपंच आण्णासाहेब माळी यांनी शिवाजी महाराजांच्या फोटो ला हार घालून पुढील कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
गावातील प्रमुख पाहुणे सरपंच अण्णासाहेब माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे , अध्यक्ष - व्ही.टी.हरिश्चंद्रे , युवा नेतृत्व अमोल हरिश्चंद्रे,शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा विप्रदास ,इतर शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीकन्या मयुरी गुंजाळ यांनी केले. कार्यक्रमावेळी विद्यार्थी व कृषीकन्या देशमुख स्वाती आणि गायकवाड यशांजली यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन मारुती कुलट सर यांनी केले.अश्या रीतीने कार्यक्रम यथायोग्य पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. के ससाने सर, कार्यक्रम समन्वयक ,डॉ. सी. एस. चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस. ए. अनारसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रेरणा भोसले, विषय तज्ञ कृषी विस्तार शिक्षण विभाग डॉ. ए. एम. चवई सर यांनी मार्गदर्शन केले.
खडांबे खुर्द येथील शिवभक्तांची शिवजयंती उत्सव धूमधडाक्यात..!!
खडांबे खुर्द येथे सकाळीं श्री शाहू विद्या मंदिर या विद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थीनी विद्यालयालय ते थेट खडांबे खु. नविन गावठाण पर्यंत पारंपारिक वाद्याच्या गजरात, तसेच पारंपारिक वेशभूषा परिधान करून भव्य मिवणुक काढली आणि गावात मिवणुक आल्यानंतर गावातील सर्व शिवभक्तांनी या मिरवणुकीचे कौतूक करत स्वागत केले. तसेच या मिवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवरायांची आरती करत शिवगर्जना दिल्या.
यावेळी सरपंच अण्णासाहेब माळी, उपसरपंच किशोर हरिश्चंद्रे,माजी उपसरपंच प्रभाकर हरिश्चंद्रे, ग्रामपंचायत सदस्य- अंशाबापू आवरे,जॉनी पवार, मोहन खळेकर, युवा नेतृत्व अमोल हरिश्चंद्रे, किरण हरिश्चंद्रे, मयूर शेळके, उत्तम कल्हापुरे, शुभम शेळके, योगेश मोकाटे आदि. महिला, विदयार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक,शिक्षिका उपस्थीत होत्या.
तसेच जगदंबा माता मंदीर येथून सायंकाळी ०६ ते रात्रि उशिरा पर्यंत डी. जे. तालावर ठेका धरत सर्व शिवभक्तांनी शिवजयंती उत्सव धूमधडाक्यात साजरा केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच शिवभक्तांनी काळजी घेतली. सर्वांनी या उत्साहात मनापासून भाग घेत आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी राहुरी- नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार प्राजक्त तनपूरे यांनी सर्व शिवभक्तांच्या विनंतीला मान देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600







