*शिवसेनेच्या(शिंदे गट) इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महारुद्र पाटील यांचा केला सत्कार*
इंदापूर: .महारुद्र पाटील यांची काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या(शिंदे गट) इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना कार्यालय इंदापूर या ठिकाणी महारुद्र पाटील यांचा शिवसेना, भाजप व प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी यथोचित सन्मान केला. यावेळी शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख .सुरज काळे, इंदापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ प्रहार संघटनेचे अध्यक्ष .दादाराम शिंदे, शहर प्रमुख अशोक देवकर, उपतालुकाप्रमुख बबन खराडे, वसंतराव आरडे, दुर्वास शेवाळे, बालाजी पाटील, सागर आवटे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सचिव .किरण काळे तसेच इंदापूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्याबद्दल महारुद्र पाटील आणि त्यांचे सहकारी व शिवसेनेचे पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

