shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकनाथराव शिंदे हे सामान्यांना आपलेसे वाटणारे मुख्यमंत्री : खा. सदाशिवराव लोखंडे

शौकतभाई शेख
शिर्डी - महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आणि एकनाथरावजी शिंदे  हे मुख्यमंत्री झाले. हा बदल होताच प्रशासनातही प्रचंड प्रमाणात बदल होऊन शासनाच्या कामाला देखील मोठी गती मिळाली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रशासनातील प्रदिर्घ अनुभवामुळे त्यांची सर्व स्तरातील अधिकारी वर्गावर पकड आहे. त्यामुळे राज्यकारभार गतीने हाकला जात आहे. राज्य सरकारचा कारभार हा आता सर्वसामान्य जनतेच्या मनाप्रमाणे सुरू झाला असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे हे सर्वसामान्यांना आपला मुख्यमंत्री म्हणून वाटत असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शिर्डी येथे मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मिटिंग प्रसंगी व्यक्त केले. 


येत्या ९ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा  वाढदिवस साजरा करताना  त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना आवडणाऱ्या आरोग्याशी संबंधित विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे,अनेक प्रकारचे आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम राबवित साजरा करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात असेही ते म्हणाले.  पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री हे राज्यातील प्रत्येक  नागरिकाच्या आरोग्याच्या बाबतीत खूपच संवेदनशील आहे. ते सतत आरोग्य खात्याच्या मार्फत राज्यातील जनतेला,  विशेषतः  ग्रामीण भागातील अगदी वाडी, वस्ती, तांडा, पाडा, दुर्गम भागातीलही नागरिकांना आरोग्याच्या अधिकाधिक सुविधा कशा प्रकारे प्रदान करता येतील यावर त्यांचा भर असतो. कारण कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे आरोग्य बिघडले तर संपूर्ण कुटुंब व्यवस्था बिघडून ढिली पडते.  अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देता देता संपूर्ण कुटुंब अनेक स्तरांवर उध्वस्त होते. याकरीता ना.शिंदे त्यांचे आरोग्य विभागावर विशेष लक्ष आहे.

अशाप्रकारे आरोग्याशी संबंधित सामाजिक उपक्रम राबित आपण  मुख्यमंत्री साहेबांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देऊयात असेही मार्गदर्शन खा.सदाशिवराव लोखंडे यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले. प्रारंभी जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी खा.सदाशिवराव लोखंडे यांचा चालू असलेल्या विकास कामांचा धडाका, त्यातून मतदार संघातील नागरिकांमध्ये आलेलं चैतन्य. खासदार साहेबांशी जनतेशी वाढलेली जवळीक. त्यातून खासदारांना मिळणखरा आशिर्वाद आणि धन्यवाद सोबतच शुभेच्छा आणि भेटीसाठी लागलेली जनतेची रिघ, कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेशासाठी येत असलेले लोंढे हे आपल्या पक्षांचं वाढलेलं बळ आहे.अशाप्रकारे  पक्षाचा मतदार संघातील वाढलेल्या आलेख त्यांनी निदर्शनास आणून दिला. पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वास दिला, प्रोत्साहन दिले. व आता आपल्याला विरोधक राहीले नाही. आपली स्पर्धा ही आपल्याशीच आहे. पक्षाचे काम, विचार सर्व प्रकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यानी पक्ष बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसापासून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या शाखेचे गावोगावी फलक लावले पाहिजेत, तसेच जास्तीत जास्त नवीन सभासद नोंदणी करून पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामे केली पाहिजे,तसेच मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गावोगावी आरोग्य शिबीर घेण्यात यावे अशी सूचना देवकर यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केली.


या मिटिंगसाठी बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, बाजीराव दराडे, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. विमल पुंडे,सौ. कावेरीताई नवले,युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, महेश देशमुख,अध्यात्मिक अघाडीचे जिल्हाप्रमुख संपतराव जाधव, उपजिल्हाप्रमुख जयंतराव पवार, आण्णासाहेब म्हसे,भाऊसाहेब गंगावणे,एकनाथ यादव,राजेश तांबे,ज्ञानेश्वर गुलदगड, मनील नरोडे,तालुकाप्रमुख रमेश काळे, देवेंद्र लांबे, राजेश सोनवणे, रावसाहेब थोरात,सुरेश डिके, संजय वाकचौरे, बापूसाहेब शेरकर, सुनिल कराळे,शहर प्रमुख बाबा कांगुणे, सुधीर वायखिंडे, सदाशिव गोदकर, सागर देठे,गणेश कानवडे,अक्षय जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शाम गोसावी, सौ. पूनमताई जाधव, सौ. मिराताई गुंजाळ,सौ. वैशाली टरेताई यांच्या समवेत बाळासाहेबांची शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना,शेतकरी सेना, महिला आघाडी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close