shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुषीत पाण्याची विल्हेवाट लावा ... अन्यथा .... ग्रामसेवकाच्या तोंडाला काळे फासणार - सनीभैय्या खरारे


 इशारा देताच .... कामाला सुरुवात 

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २७ /    भिंगार येथील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालय जवळ असलेले अमरधामच्या मुख्य द्वार समोरच गेल्या अनेक दिवसापासून दूषित मैलमूत्र सांडपाणी साचलेले होते.या भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वारंवार तोंडीं व लेखी तक्रार देऊनही सदरील ग्रामपंचायतील अधिकारी या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आहे.

या दूषित सांडपाण्यामुळे या परीसरात डेंगू, मलेरिया सारखे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे. नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.नागरिकांना सर्वात मोठा प्रश्न हा होता की अंत्यविधी साठी येणाऱ्या व जाणाऱ्या दुखत नागरिकांनी या अमरधाम मध्ये प्रवेश करायचा कसा ? अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी केली होती की लवकरात लवकर या दूषित पाण्याची विल्हेवाट लावावी अन्यथा संघटनेच्या वतीने  ग्रामसेवकाच्या तोंडाला काळे फासण्यात येईल .

 वडारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी या विषयावर तातडीने दखल घेतली व कामाची सुरुवात करण्यात आली.या वेळी संघटनेचे शिष्टमंडळाने कामाची पाहणी केली यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे, ग्रामसेवक पुंड भाऊसाहेब, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा सचिव धिरज बैद,संजय खरे,वाल्मिकी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तालेवार गोहेर, सामाजिक कार्यकर्ते किशोर उबाळे, आरपीआयचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, दिपक नकवाल आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close