shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी गावाच्या परिसरातील ९५ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी.

वडापुरी गावाच्या परिसरातील ९५ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक 6/2/2023 रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयोगाने निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या  कार्यक्षेत्रातील वडापुरी गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
 यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक  दत्तात्रय रामचंद्र शिर्के यांच्या शुभहस्ते आरोग्य तपासणीस सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली.
 यावेळी निरा भिमाचे सभासद कुंभार दत्तात्रय गणपत, टोळी मालक महेश मारोतराव देशमुख, निरा भिमाचे अधिकारी श्री पवार अंबादास रामचंद्र ॲग्री ओव्हरसियर गटप्रमुख सुरवड, कर्मचारी श्री. देवकर उमेश रघुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करता वेळी केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार मॅडम नर्स गौरी राठोड ,सानिका फुलारी ओल्ड बॉय रणजीत साठे, केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर आणि संजय शेलार सर यांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी पूर्ण झाली.
close