*मयत मुलीच्या कुटुंबीयांना गुन्हा न नोंदविण्यासाठी दबाव कुणाचा ?
अहमदनगर (प्रतिनिधी)- बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे मृत पावलेल्या विवाहित मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अंत्यसंस्कार केले . मोठ्या प्रमाणात औषधाचा साठा सापडलेल्या मेडिकल मालकावर तसेच गावातील सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच मुख्य आरोपीवर भा.द.वी. कलम 304 नुसार कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले. यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत विजय मिसाळ, देवदत्त पाटील आदी उपस्थित होते.
रुईछत्तीसी येथे ज्ञानेश्वर निवृत्ती पवार या बोगस डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या उपचारामुळे बालपणात उपचार घेत असताना पूजा हिचा मृत्यू झाला त्यानंतर स्थानिक व्यक्तींनी संबंधित डॉक्टर बोगस असल्याने तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.असता तालुका आरोग्य अधिकारी यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर न्यानेश्वर पवार यांच्या विरोधात भादवि कलम 420 तसेच इतर किरकोळ कलमाने गुन्हा दाखल केला. त्या संबंधित डॉक्टर चालवीत असणाऱ्या डी बी. भोस. नावाच्या दवाखान्यात पोलिसांनी केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात औषधाचा साठा आढळून आला तरीही या बोगस डॉक्टराला औषधाचा पुरवठा पुरवणारी मेडिकल एजन्सी विरोधात अद्यापर्यंत कुठल्याही स्वरूपाची ठोस कारवाई केलेली नाही, तसेच बोगस डॉक्टर मुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूस कारणीभूत म्हणून भादवी कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तो करण्यात यावा. अन्यथा येणा- या आठ दिवसात संबंधीत दोषिवर कडक कार्यवाही न झाल्यास गोर गरीबांचा जिव किडया मुंगीप्रमाणे समजणा-या भ्रष्ट्र पोलिस यंत्रणेच्या विरोधात ४ मार्च शुक्रवार रोजी आत्मदहन करणार येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

