*किरण काळे युवा मंचच्या वतीने पळसदेव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी*
इंदापूर:पळसदेव येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप अडवाल यांच्या प्रणव लॉन्ड्री या ठिकाणी थोर समाज सुधारक, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गाडगेबाबा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी पळसदेव भाजपचे अध्यक्ष रावसाहेब काळे, भूविकास बँकेचे माजी व्यवस्थापक एकनाथ शेलार साहेब, इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक भारत बांडे, आईसाहेब मच्छी मार्केट भिगवणचे व्हाईस चेअरमन माणिक नगरे, पळसदेवचे माजी उपसरपंच संतोष काळे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सचिव किरण काळे, प्रहार संघटनेचे ज्येष्ठ नेते दादाराम शिंदे, अंकुश काळे, चंद्रकांत खत्री, नितीनकुमार काळे, संगमशेठ शहा, निलेश बागडे, सामाजिक कार्यकर्ते अंबादास भिसे व दिलीप अडवाल, दिलीप डोईफोडे, माऊली डोईफोडे व पळसदेवचे ग्रामस्थ उपस्थित होते.

