shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हास्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयाचे यश

 जिल्हास्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयाचे यश
इंदापूर: "पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ पुणे" जिल्हा आयोजित "आंतरशालेय हिंदी निबंध" स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी च्या कु.मृणाली प्रताप डोईफोडे व कु.गौरी विजय मारकड या विद्यार्थिनींना उत्कृष्ट निबंध लेखनाचे पारितोषिक मिळाले.
     विद्यालयाचे प्राचार्य  भीमराव आवारे, हिंदी विषयाचे अध्यापक  राजेंद्र रणमोडे सर, अनिल फडतरे सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 
संस्थेचे अध्यक्ष  हर्षवर्धन पाटील  ,संस्थेचे जेष्ठ संचालक  उदयसिंह पाटील, निरा भिमाचे संचालक  राजवर्धन पाटील, संस्थेचे सचिव किरण पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष  मनोज पाटील या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

close