shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर - पारनेरच्या रस्त्यावर लिहिले 'शरद पवार-गो बॅक'..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३

अहमदनगर - पारनेरच्या रस्त्यावर लिहिले 'शरद पवार-गो बॅक'..!!

अहमदनगर, (पारनेर) :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  हे आज ता. (१० मार्च) पारनेरच्या दौऱ्यावर येणार आहेत. जवळा इथे उद्धाटन आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव आणि पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला आहे. 
      कारखाना बचाव समितीकडून 'शरद पवार-गो बॅक' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री पारनेरच्या रस्त्यावर 'शरद पवार-गो बॅक' असं लिहिण्यात आलं आहे. जवळा-निघोज आणि निघोज-देवीभोयरे या रस्त्यावर 'शरद पवार-गो बॅक' असा मजकूर लिहित विरोध दर्शवण्यात आला आहे.

🏭 कारखान्याच्या विक्रीसंदर्भात आरोप...
पारनेर साखर कारखान्याची भ्रष्ट मार्गाने विक्री करुन शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार विदुरा नवले यांनी तो बळकावल्याचा कारखाना बचाव समितीचा आरोप आहे. यासाठी शरद पवारांनी त्यांना मदत केल्याचे पुरावे असल्याचा दावा समितीने केला आहे. याबाबत कारखाना बचाव समितीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात पारनेर कारखाना विक्रीबाबत एकून पंचवीस प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. शरद पवारांनी दौऱ्यापूर्वी या प्रश्नांचा खुलासा करावा, असं कारखाना बचाव समितीने म्हटलं आहे. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न दिल्यास शरद पवारांच्या दौर्‍यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली जाईल, असा इशारा कारखाना बचाव समितीकडून देण्यात आला आहे. 

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close