shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आष्टी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी बारा तासात आरोपींना अटक



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

आष्टी: दि. २४/ वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून कोणताही पुरावा हाती नसताना अवघ्या बारा तास आरोपींना अटक केली. सदर गुन्ह्याची माहिती अशी की दिनांक 20.03.2023 रोजी फिर्यादी नामे- श्रीकृष्ण रामभाऊ धुर्वे वय 43 वर्ष धंदा- अँटो चालक रा. प्लॉट नं. 19 धोटे लेआऊट, जुनी अजनी नागपुर, यांनी तोंडी रिपोर्ट दिली की दिनांक 18.03.2023 रोजी सायकांळी 04.30 वा. दरम्यान मौजा- साहुर शेत शिवारात यातील आरोपीतांनी संगनमत करुन फिर्यादी व त्यांच्या मित्रांना कमी दरात सोने देतो असे सांगुन घटनास्थावर बोलावुन घेतले व फिर्यादी यांचे जवळ असलेले नगदी 2,00,000 रु. व 03 अँड्रॉइड मोबाईल कीं 15,000 रु. असा एकुण जु. कीं 2,15,000 रु.चा. माल फिर्यादीस हातबुक्यांनी मारहान करुन जबरदस्तीने हिसकावुन घेतला व पळुन गेले. अशी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे, आष्टी येथे अप.क्रमांक 73/2023 कलम 395 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्हयामध्ये आरोपीतांची कोणतीही ओळख किंवा माहीती फिर्यादीकडे नसतांना पोलीसांनी कौशल्याचा वापर करत पोस्टे हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या संशयीतांना ताब्यात घेवुन अतिशय कसोटीने संशयीताकडे चौकशी करुन सदरचा गुन्हा 12 तासाचे आत उघड केला. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे- 1) सच्चाई हरीदास सोलंकी वय 23 वर्ष रा. बोरगांव टुमणी, 2 ) आकाश शेरु भोसले वय 26 वर्ष रा. बोरगांव टुमणी, 3) आदित्य राजुजी ब्राम्हणे वय 23 वर्ष रा. वर्धपुर, 4 ) आतेश जयन भोसले वय 22 वर्ष रा. बोरगांव टुमणी ता. आष्टी यांना सदर गुन्हयात अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयातील चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

तसेच ठाणेदार मा. लक्ष्मण लोकरे साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो.उप.नि. अनिल देरकर, आजीनाथ दौड, पो. हेड. कॉ. अमित जुवारे, गजानन वडनेरकर नापोकॉ. राजेश पाटील, पो.कॉ. मंगेश भगत, सचिन ढाले, बालाजी सांगळे, रोशन दाहे, संजय बोकडे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. उप.नि. अनिल देरकर करत आहे.
close