shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेर्ले सोसायटीवर जगताप गटाचे वर्चस्व



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ करमाळा तालुक्यातील नेर्ले गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे. जगताप गटाचे सोसायटीचे विद्यमान चेअरमन तानाजी जगताप  यांच्या नेतृत्वा खालील  ग्रामविकास शेतकरी पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले. इतर मागास प्रवर्गातून फिरोज मोमीन यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते. अन्य विजयी उमेदवारांमधे तानाजी जगताप, राहुल भोसले, शहाजी गवळी, नाना नाईक, रुपेश पोळ, सौ. कान्होपात्रा पन्हाळकर, सतीश शेळके, सखाराम ठोंबरे, सौ. सुरेखा गलांडे, सौ पद्मिणी दोंड, लक्ष्मण कोपनर, अभिमान लोंढे यांचा समावेश आहे.

सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप यांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ .एस . के . मुंढे यांनी काम पाहीले. मतदान व मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
close