शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
शालेय विद्यार्थ्यात चित्रकला, निबंध स्पर्धा यांच्या माध्यमातून शिवरायांचे विचार रुजविण्याचे काम ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे होत आहे. युवकांनी पुढे येवुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रामनाथ सदाफळ यांनी केले.
केलवड येथील श्री साईबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रमेश वाघे व सचिव विकी जोर्वेकर यांच्या पुढाकाराने व राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. ज्ञानेश्वर विद्यालय व प्राथमिक शाळा केलवड येथे शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर शिवरायांच्या जीवनावरील निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी सदाफळ बोलत होते. अध्यक्षस्थानी स्कुल कमिटीचे अध्यक्ष पी.डी. गमे होते. या प्रसंगी टिक टॉक स्टार शंतनु शिंदे, साईबाबा सेवा भावी संस्थेचे संस्थापक रमेश वाघे, सचिव विकीराज जोर्वेकर, दत्तू जराड, रामदास वाघे, सौरभ बागरेचा, शुभम गमे, किरण गुंजाळ, ऋषी कांदळकर, मेजर विजय गाडेकर, मेजर आण्णासाहेब गमे, मेजर दिपक गायकवाड, छत्रपती युवा सेनेचे महेश रेवगडे, मुख्याध्यापक महेंद्र जेजूरकर यांचेसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. रामनाथ सदाफळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महान आहे. नविन पिढीला ते माहिती होणे गरजेचे आहे. जयंतीच्या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धेमुळे शिवरायांचे कार्य चिमुरड्यांना अवगत होईल. ग्रामीण भागात रमेश वाघे, विकी जोर्वेकर यांनी शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश वाघे यांनीही आपले विचार मांडले. पी. डी. गमे यांनी अध्यक्षीय भाषणात तरुणांचे कौतुक केले. सुत्रसंचालन सोपान हिरगळ यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार मुख्याध्यापक महेंद्र जेजूरकर यांनी मानले. यावेळी रमेश वाघे व विकी जोर्वेकर यांनी ज्ञानेश्वर विद्यालयास इन्व्हर्टरसाठी बॅटरी देण्याचे जाहीर करुन काही रक्कम विद्यालयास दिली. आकाश मिडा, सुनिल धुतिया, संदिप शेट्टी, सतीषकुमार चौंडे, सुधीर आचार्य, विकी नेदर यांच्या आर्थिक निधीतुन शिवजयंती उत्सव व शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

