*रमजान मुबारक २०२३*
दिनांक २७-०३-२०२३
सोमवार,रोजा नं.०४ था
लेखक डॉ सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर
९२७१६४००१४
*"रोजा-" तुम्हाला तुमच्या मनातील निययत -ईच्छा प्रमाणेच फळ मिळते..."
*खलिफा उमर बिन खत्ताब रजि.
*रोजा:- मधुमेही व आजारी रुग्णांसाठी पर्याय उपलब्ध आहेत ....."
इस्लाम मधील प्रमुख सहा विश्वासू - विश्वासार्हता पुस्तकापैकी " सहीह बुखारी शरीफ" या हादीस मधील पहिलीच हादीस आहे की," एकदा दुसरे खलिफा उमर बिन खत्ताब रजि.नीं प्रबोधन करताना सांगितले की, प्रेषित हजरत मुहम्मद स्व.यांनी म्हटले होते की, "कोणत्याही कामाची सुरुवात ही तुमच्या मनातील प्रमुख इच्छा (निययत) वरच अवलंबून असते. तुम्ही जसं (निययत ,विचार) इच्छा कराल तेच तुम्हाला फळ भेटेल" (सहीह बुखारी शरीफ न. १)
अर्थात:- " जसं पेरले तसेच उगवतं "
"हा नियम जवळपास जगातील सर्व घटकांना लागू पडतो."
प्रेषित हजरत मुहम्मद स्व. सांगतात की,"अल्लाह (ईश्वर) म्हणतात की, रोजा फक्त माझ्यासाठीच आहेत आणि फक्त मीच रोजा चं बदला (बक्षिसे) देणारा आहे तर मी जरूर देईन ".(हादीस बुखारी शरीफ आ.न.१९०४)
सध्या रमजान मुबारक महिन्यातील चौथ्या रोजा चाललाय,मार्च महिन्यांत उन्हाळ्याची चाहूल व सुरुवात च असते परंतु सध्या अवकाळी पावसाने महाराष्ट्र राज्यातील बहुतेक भारतातील बहुतेक भागात गारपिटीने अवकाळी पावसाने थैमान घातले होते म्हणून वातावरणात थोडं थंड हवेचे प्रमाण वाढले आहे.म्हणुन रोजे समजेनासे वाटत आहेत परंतु थोड्याच दिवसांत उन्हांचे चटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच जे विविध प्रकारच्या जर्जर आजार उदा.मधुमेह - रक्तदाब- हृदयविकार - थायरॉईड - संधीवात - किडनीचे आजार - मुतखडा - अशक्तपणा - वयोवृद्ध व्यक्ती - अशांना रोजे ठेवण्यासाठी नियोजन करण्याची अत्यंत आवश्यक गरज आहे.
वरील सर्व आजार हे दीर्घ काळ बरोबरच असतात पुर्ण बरे होत नसतात तर योग्य वेळी निदान झाल्यास योग्य उपचार आहारोपचार, व्यायाम जीवनशैलीत योग्य बदल व नियमित पालन व औषधी वेळेवर घेतल्यास नियंत्रित राहु शकतात.२००३ च्या जगातील एकूण १९ कोटी मधुमेहीपैकी पाच कोटी फक्त भारतातच आहे. मधुमेह नियंत्रित राहणारा आजार आहे, परंतु त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे नियमन करणारी यंत्रणा कोलमडून पडते.गोड खाल्ले का रक्तात साखर वाढते,हे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी औषधे,इन्सुलिन ची गरज पडते. रक्तातील साखरेचे प्रमाण हे सकाळी उपाशीपोटी ६० ते १०० व जेवणानंतर (पोस्ट मिल) १०० ते १४० मिलीग्राम असणे गरजेचे आहे. यासाठी वारंवार तपासणी करण्याची गरज आहे "ग्यायसेमिक इंडेक्स" प्रमाणेच खाद्यपदार्थ खाल्लं पाहिजे. रोजा ठेवताना " सेहरी " करताना सर्व अन्नघटक मर्यादित प्रमाणात खाणे उचित ठरेल. त्याबरोबर आपल्या दैनंदिन औषधे सकाळी सेहरी बरोबरच घेणे फक्त मात्रा (डोस) कमीप्रमाणात घेणे, इन्सुलिन इंजेक्शन चा डोस थोडा आपल्या आजाराच्या परिस्थिती नुसार घेणे उचित ठरेल. बरोबरच ॲसिडिटी वरील गोळ्या जरूर घेणे,ज्या मधुमेही रुग्णांना दिवसांत दोन वेळा इन्सुलिन डोस आहे , आशा मधुमेहींनी संध्याकाळी ईप्तारी (रोजा सोडणे) सोडण्याबरोबरच छोटासा इन्सुलिन डोस घेऊन रोजा (ईपतार) करून नंतर आपल्याला पचेल रुचेल असा आहार घ्यावा..व वारंवार आपल्या आरोग्याची तपासणी करावी म्हणजे तुम्हाला संपूर्ण महिनाभर रमजान चा रोजा ठेवता येईल. ज्या मधुमेही रुग्णांना दिवसांत तीन वेळा इन्सुलिन डोस आहे आशा मधुमेहींनी रोजा ठेवुच नाही..आणि उत्साहाने सहभागी झाल्यास आपल्या बरोबर घरातील मंडळींचे ही हाल होतात.
इस्लाम मध्ये कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.विशेष बाब म्हणजे तुमची इच्छा होती रोजा ठेवण्याची मात्र काही आजारपणामुळे ती पुर्ण होऊ शकत नाही,तर अल्लाह कबुल व क्षमा करणारेच मात्र जर काही अजारपण नाही आणि रोजा ठेवत नाही तर आपणास दुसऱ्याची तहान भुक शेवटी कळणार तरी कशी ? हे देखील तीतकेच महत्त्वाचे आहे.
काही गोष्टींना चांगले पर्याय उपलब्ध असतात,या सक्ती त्या लोकांना लागू आहेत की जे शारीरिक दृष्ट्या सक्षम व तंदुरुस्त आहेत . अशांना फार सक्तीने रोजा ठेवण्याची ताकीद केली आहे.शेवटी वरील पहील्या हादीस नुसार दुसरे खलिफा उमर बिन खत्ताब रजि म्हणतात की," तुम्हाला तुमच्या मनातील निययत ईच्छा प्रमाणेच फळ मिळते.".
अल्लाह (ईश्वर) तर तुमच्या मनातील सर्व निययत- ईच्छा ओळखत आहे , तो तर सर्व मना- मनातील भावना -जानतो, तुम्हाला तुमच्या मनातील निययत प्रमाणे फळ तर मिळणारच आहे...(क्रमशः)..
बाकी आजारांवर उद्या बोलू या...
(मित्रांनो जर लेख आपणास आवडला तर नक्की आपल्या मित्रांना जरूर पाठवा , कृपया खाडाखोड करू नयेत, प्रतिक्रिया अवश्य कळवा.)
आपला मित्र - डॉ. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर..

