shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दलित वस्ती योजनेतून ३ कोटीचा निधी आमच्या पाठपुराव्याने व आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर- मा.नगरसेविका राजश्री मखरे व मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांचा दावा.

दलित वस्ती योजनेतून ३ कोटीचा निधी आमच्या पाठपुराव्याने व आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर-  मा.नगरसेविका राजश्री मखरे व मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांचा दावा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील  दलित वस्ती योजनेतून विकास कामासाठी ३कोटी रुपये मंजूर झालेले असून या मंजूर निधीचा श्रेयवाद भाजप व राष्ट्रवादीमध्ये दिसून येत आहे. ज्या प्रभागांमध्ये हा निधी मंजूर झाला आहे .त्या प्रभागातील नगरसेविका राजश्रीताई मखरे व नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी या मंजूर झालेला निधी हा आमच्या पाठपुराव्यामुळे व आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचा दावा त्यांनी व्यक्त करून दाखवला आहे.

 यावेळी व्यक्त करताना नगरसेविका राजश्री मखरे म्हणाल्या की,पुणे जिल्हा नियोजन समितीमार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये ३ कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. या कामांमध्ये प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा तिसरा मजला आणि ज्योतिबा माळावरील स्मशानभूमी ते शिवाजी मखरे घर पर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज स्मशानभूमी सुशोभीकरण व इतर दोन कामे आहेत. या कामाची मंजुरी झालेली आहे. या कामाचा मी स्वतः या प्रभागाची नगरसेविका राजश्री अशोक मखरे व नगरसेवक दादासाहेब सोनवणे आम्ही २०१७ पासून याचा पाठपुरावा केला.  आमचे नेते जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून तसेच विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी शासन दरबारी याच्या मागण्या केल्या. त्यांच्या मागण्याच्या प्रयत्नातून या आमची आजची कामे आहेत. त्या कामाला मंजुरी मिळाली आहेत. त्यामुळे मी प्रदीप गारटकर  व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना प्रभागाच्या वतीने धन्यवाद देते.
 तसेच आज या कामासाठी श्रेय वादाची लढाई चालू आहे. जो तो येतो आणि छाती ठोकपणे सांगत आहे की, आम्ही काम मंजूर करून आणली. जे विरोधक आहेत तेही सांगताहेत की, काम आम्ही मंजूर करून आणली आहेत. परंतु जनता आज दूध खुळी नाही या भागातील सर्व लोकांना माहित आहे की , प्रदीप गारटकर , आमदार दत्तात्रय भरणे यांनी कामे मंजूर करून आणली आहेत. त्यामुळे याचे श्रेय दुसऱ्या कोणी घेऊ नये. त्यामुळे पुन्हा एकदा प्रभागाच्या वतीने  प्रदीप गारटकर व दत्तात्रय भरणे यांना धन्यवाद अशा शब्दात त्यांनी दावा केला आहे.
close