शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३
ध्येयवेड्या तरुणाचा प्रेरणादायी प्रवास, आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश..!!
प्राध्यापक प्रमोद जाधव हे आंतरराष्ट्रीय अभियोग्यता पात्रता परीक्षेत रसायनशास्त्र विषयातून उत्तीर्ण..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथील प्रा. प्रमोद जाधव हे नुकत्याच आय. आय. टी कानपूर द्वारे घेण्यात आलेल्या गेट-२०२३ या आंतरराष्ट्रीय अभियोग्यता पात्रता परीक्षेत रसायनशास्त्र या विषयातून तिसऱ्यांदा उत्तीर्ण झाले आहेत.
यापुर्वी त्यांनी आय. आय. टी पवई २०२१ व आय. आय. टी खरागपुर २०२२ या परीक्षेत देखील यश मिळविलेले आहे.
प्रा. प्रमोद जाधव यांनी सी. एस. आय. आर-नेट ह्या परिक्षेत देखील संपूर्ण भारतात ६९ वा क्रमांक मिळवला होता.
तसेच महाराष्ट्र-सेट परीक्षेत देखील दैदिप्यमान यश मिळवलेले आहे. सामान्य कौटुंबिक परिस्थिती असूनही अतिशय जिद्दीने त्यांनी हा यशाचा डोंगर सर केला आहे.
त्यांच्या या यशा बद्दल कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे, प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, सौ. स्वाती हापसे, प्रा. संदीप रोहोकले, भास्कर जाधव, भाऊसाहेब साठे, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब जाधव, भाऊसाहेब पटेकर व आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रा. प्रमोद जाधव हे सध्या राजर्षी शाहू महाविद्यालय, देवळाली प्रवरा येथे रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

