प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १३ / चास येथील सौ.सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक चास अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने 'उद्योजोकता विकास' या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा उत्साहात पार पडली असून त्यामध्ये अंतिम वर्षातील २७० विद्यार्थी सहभागी झाले होते.
'इन्स्टिट्यूट ऑफ रुलर आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंटचे विभाग प्रमुख मिस्टर सारंग सेटवाल यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ , उपाध्यक्ष मा श्री विश्वनाथ माणिक आडसूळ , प्राचार्य गडाख आर .एस .,सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इन्स्टिट्यूट ऑफ रुलर आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट अहमदनगर येथील विभाग प्रमुख मिस्टर सारंग सेटवाल यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.त्यांनी उद्योग क्षेत्रांना काय हवे आहे , त्याला अनुसरून शिक्षण दिले गेले पाहीजे. आज ७० टक्के लोक स्वतःच्या उपजिविकेसाठी मोलमजूरी ते छोटा व्यवसाय करीत आहे . त्यात अशिक्षीत , शिक्षीत , बेरोजगार आदींचा समावेश आहे . शिक्षीत नोकरीच्या मागे जात आहे, त्यांनी स्वताच व्यवसाय सुरू करून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी नवनवीन संशोधन करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य गडाख आर. एस. प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा.एम के जगदाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा . दत्ता गिरी , प्रा .कविता काटोले, प्रा .पवळे एस एस, प्रा.पालवे पी. डी., प्रा.जाधव एम बी. यांनी परिश्रम घेतले.

