shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरात आ.नमिता मुंदडा यांच्या हस्ते विविध विकासकामांचा २९ मार्चला लोकार्पण व भुमिपुजन सोहळा!



भाजप जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व रमेशराव आडसकर यांची राहणार उपस्थिती
 
विकास कामाच्या बाबतीत दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती-हारून भाई इनामदार!! 

प्रकाश मुंडे  /  बीड जिल्हा प्रतिनिधी  :-
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सहकार्याने केज शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार  हारुण इनामदार यांनी व्यक्त केला असून  सदरील विविध विकास कामाचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा बुधवारी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. 


केज नगरपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामावर भर देत त्यांनी शहरासाठी आणलेल्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा बुधवार (दि.२९) मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता नगरपंचायत कार्यालय केज येथे आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश आडसकर हे असतील.भाजप जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,युवा नेते अक्षय मुंदडा,कृ.उ.बा.स. मा.सभापती अंकुशराव इंगळे,जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार,मा,नगराध्यक्ष आदित्य पाटील,यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसीलदार दुलाजी मेंडके,मा.सरपंच युवराज दादा काळे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव कदम,गटनेते,न.प.राजुभाई इनामदार,न.प.गटनेते राष्ट्रवादी  रामचंद्र गुंड,ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,शिवसेना ता.प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे,पशुपतीनाथ दांगट,रमेश गुळभिले,भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार,भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.वासुदेव नेहरकर,डॉ,त्र्यंबट चाटे,रिपाइंचे ता.अध्यक्ष दीपक कांबळे,ॲड.महादेव लाड,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी हे असतील. दरम्यान,पहिल्या टप्प्यात ५ कोटींच्या निधीतून केज शहरातील मुलभूत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार आहे. 

अशी माहिती जनविकास परीवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार यांनी दिली.केज नगरपंचायत अंतर्गत ५ कोटींचा कामाचा शुभारंभ सोहळा व बांधकाम मजुरांना किट वाटपाच्या कार्यक्रमाला केज शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड,उपनगराध्यक्षा शीतलताई दांगट,नगरपंचायतचे मुख्याधिकारी महेश गायकवाड,सर्व सभापती,नगरसेवक, कर्मचारी, व नगरपंचायत कार्यालय केज यांनी केले आहे.
close