अवकाळी पावसाचा व गारटीपीटीचा इंदापूरला मोठा फटका - आमदार दत्तात्रय भरणे.
ताबडतोब पंचनामे करण्याच्या आ.दत्तात्रय भरणे* *यांच्याकडून तहसीलदार यांना सुचना
इंदापूर प्रतिनिधी : अवकाळी पावसाने इंदापूर तालुक्यातील शेतीची प्रचंड वाताहत झाली असून,शेतीला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्वरीत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
मागील दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला असून अद्यापही पावसाचे वातावरण आहे.
या विषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,मागील दोन-चार वर्षांपासून वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यातच अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभारले असून ऊस,डाळिंब, केळी,पेरु,द्राक्षे यासारख्या फळबागांचे खूप मोठे नुसनान झाले आहे.सध्या शेतमालाची कवडीमोल दराने विक्री होत असल्याने आधीच शेतकऱ्यांना खर्चही निघेनासा झाला आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.त्यातच अशा अवस्थेत अवकाळी पावसाने शेतकरी अजून अडचणीत आणले आहे.त्यामुळे शासनाकडून तात्काळ मदत मिळणे अत्यावश्यक असल्याने तहसिलदार यांनी ताबडतोब नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी सुचना दिल्या असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले आहे..

