shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निर- निमगावात कै. रोहन बाळासो गरगडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

निर-  निमगावात कै. रोहन बाळासो गरगडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.


१४५ व्यक्तींनी डोळे तपासणी,२४ पेशंटची शस्त्रक्रियेसाठी निवड ,३५ रुग्णांना चष्मे मोफत वाटप करण्यात येणार.
इंदापूर प्रतिनिधी: ता.१६  निर-  निमगाव( ता. इंदापूर) येथील कै. रोहन बाळासो गरगडे यांच्या जयंतीनिमित्त बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र निर-  निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी पार पडले. या शिबिरामध्ये उपचार, शस्त्रक्रिया, मोतीबिंदू ,काचबिंदू, तिरळेपणा, डोळ्यातून पाणी येणे, लासरू, तसेच नंबर काढणे १४५ व्यक्तींनी डोळे तपासणी पार पडली.
  २४ पेशंटची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन  अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तामामा घोगरे यांचे शुभहस्ते व माजी सरपंच भगवान वावरे यांचे हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमास विकास सोसायटीचे चेअरमन रंजीत घोगरे ,ज्ञानदेव जाधव सर, प्रताप देवडे, गोरख देवडे, हनुमंत गरगडे साहेब, हनुमंत गरगडे गुरुजी, शिवाजी जाधव सर, छगन पिसे सर, सौ शोभाताई घोगरे ,हरी लंबाते, दीपक गरगडे ,कृष्णा धालपे, संतोष गरगडे, मारुती गरगडे, हनुमंत सावळकर, राहुल गरगडे, अण्णा कुचेकर, अण्णा पवार, इत्यादी उपस्थित होते.
 शिबिर यशस्वी होण्यासाठी आरोग्य उपकेंद्र निर निमगाव च्या डॉ. मेहता सस्ते व त्यांचा सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले. बुधराणीचे डॉ. मोहम्मद सहस्त्रवान यांनी विशेष सहकार्य केले व १४५ पेशंट तपासून योग्य सल्ला व चष्म्याचे नंबर काढण्यात आले.
 रोहन हा अनंतराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब गरगडे यांचा मुलगा असून त्याचे निधन झाले आहे त्याच्या स्मृतिपित्यार्थ श्री गरगडे सर यांनी रोहन यांच्या जन्मदिनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन  १६ एप्रिल २०२३ केले होते. यावेळी श्री गरगडे यांनी गरजूंना ३५ चष्मा वाटप करण्याचे नियोजित केले असून चष्मे गुरुवार दिनांक २० एप्रिल रोजी  ३५ रुग्णांना त्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
close