shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलेस मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटी दाखल करा , अन्यथा ....


भारतीय वाल्मिक संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ५ /   दलित समाजातील  महिलेस जातीवाचक शिवीगाळ व अमानूषपणे बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा करण्याबाबत दि . ५ एप्रिल रोजी भारतीय वाल्मिक संघटना व संपूर्ण दलित समाजाच्या वतीने अहमदनगर चे मा .जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,  देहूरोड या ठिकाणी राहणाऱ्या दलित (वाल्मिकी) समाजातील  महिलेला दि .२१ मार्च २०२३ रोजी देहू रोड येथे  समाजकंटकानी अमानुषपणे बेदम मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल अशा जातीवाचक अश्लील शिवीगाळ केल्या. परंतु या प्रकरणी देहूरोड पोलिस प्रशासनाद्वारे या समाजकंटकावर फक्त साधा कलम लावून त्याला अटक करण्यात आली आहे. परंतु आमची भारतीय वाल्मिक संघटना व संपूर्ण दलित समाजाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. तसेच आपल्या शासन दरबारी आम्ही मागणी करतो की , सदर समाजकंटक व्यक्तीवर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.

 गुन्हा दाखल न झाल्यास संपूर्ण दलित समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय वाल्मिक संघटनेने सदर निवेदना मार्फत दिला आहे . मा.जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनाही निवेदन देण्यात आल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तालेवार गोहेर यांनी सांगितले .

यावेळी भारतीय वाल्मिकी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तालेवार सेवकराम गोहेर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवी गोहेर,जिल्हाध्यक्ष नरेश चोहान, जिल्हा उपाध्यक्ष साहिल कुडीया, सल्लागार सुरज जंगारे,अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,शिवसेना माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष अमोल छजलाने,दमन वाल्मिकी समाज अध्यक्ष गौरव लक्ष्मण सोलंकी,सामाजिक कार्यकर्ते पै.अनिल वाणे,रीतिक बागडी, अंकुश छजलाने,सुमित कुडीया, अभिजित गोहेर,प्रशांत छजलाने, जितेंद्र वाल्मिकी,क्रिश चव्हाण,धनेश्वर सोलंकी,विक्रम चौहान,सुमित मिने,आकाश कुडीया,धिरज बैद,प्रमोद चोहान,मनोज बिडलान,जितू चोहान,दिपक नकवाल आदि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
close