श्रीरामपूर प्रतिनिधी:
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार दि,२९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता निवृत्तीभाऊ बनकर मंगल कार्यालय येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ सुनीता गायकवाड यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे असणार आहेत. तर संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे,उपाध्यक्ष योगेश विटनोर, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे,सचिव सोपानराव राऊत,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, मुळा-प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे,संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, अँग्रो इंडस्ट्री.फौंडेशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, सचिव विरेश गलांडे, अशोक कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अमोल कोकणे, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर शिंदे,शितल गवारे, रामभाऊ कासार,ज्ञानेश्वर पटारे,कार्यकारी संचालक संतोष देवकर, भाऊसाहेब दौंड आदी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यास महाविद्यालयातुन शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नावलौकिक मिळविलेले माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.मेळाव्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका प्रयत्नशिल आहेत.सदर प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहनृ महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ. सुनीता गायकवाड तसेच प्रा दिलीप खंडागळे, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे यांनी केले आहे.
वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

