मिडसांगवी-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडसांगवीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कविता लेखन केले आहे.त्या कवितांचा हस्तलिखित संग्रह 'काव्यबहार' चे प्रकाशन नुकतेच मुंगूसवाडे केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव आव्हाड यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडसांगवी ता. पाथर्डी येथे संपन्न झाले.
तेहतीस विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या तेहतीस कवितांचा समावेश 'काव्यबहार,' या कविता संग्रहात आहे.आई, पाऊस, मराठी भाषा,झाडे, पर्यावरण,नदी इ. विविध विषयांवर बाल कवी , कवयित्रींनी कविता लेखन केले आहे.विविध शालेय कार्यक्रमांत हे विद्यार्थी कवितांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकतात.
सदर कार्यक्रमास संजय कर्डीले, जयश्री खेडकर, नारायण शिरसाठ,चेतन आंधळे, सुभाष सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी दीपक महाले यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब घोंगडे यांनी केले.पाहुण्यांचा परीचय कल्याण कराड यांनी करून दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर वाघ, धर्मप्रसाद जोशी, मंजुषा कानडे, मनिषा खेडकर,मिरा खोमणे यांनी प्रयत्न केले.बंकट बडे यांनी आभार प्रदर्शन केले.


