shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योगसेवेतील कार्याबद्दल पतंजलि पुरस्काराचे वितरण*

*योगसेवेतील कार्याबद्दल पतंजलि पुरस्काराचे वितरण*
  इंदापूर प्रतिनिधी :योगाचा प्रचार प्रसार,योगासन स्पर्धामधील सहभाग  आणि योगसेवेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ रुपीनगर या संस्थेस रोख एक लाख अकरा हजार  एकशे अकरा रूपये व सन्मानपत्र देऊन पतंजलि परीवार  पिंपरी चिंचवड यांचे वतीने गौरविण्यातआले. 
    रामनवमीनिमित्त डाॅ. प्रभु रामचंद्र सभागृह येथे आयोजीत कार्यक्रमामध्ये भारत स्वाभिमान न्यासचे राज्यप्रभारी भालचंद्र पाडळकर,किसान सेवा समितीचे राज्यप्रभारी उदय वाणी सोशल मिडीया प्रभारी अविनाशजी आर्य युवा सहप्रभारी प्रितेशजी लाड यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
   कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन आणि श्रीरामाच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली .डाॅ नारायण हुले यांनी प्रार्थना मंत्राने प्रारंभ केला .जिल्हाप्रभारी डाॅ अजित जगताप यांनी होमहवनचे पौरोहित्य केले.
   यावेळी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ,योगशिक्षक सचिन गावडे यांनी योगासन स्पर्धामध्ये केलेले उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अकरा हजार रुपयेव सन्मानपत्र,तर योगाच्या प्रसार प्रसारात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भोसरी विभागाला पतंजलि पुरस्कार  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.कार्यक्रमादरम्यान श्री.कैलाश काशीद यांनी श्रीरामाच्या भक्तिगीतांचे गायन केले.
    या कार्यक्रमासाठी भारत स्वाभिमान जिल्हाप्रभारी मिलींद वालझडे,डाॅ वर्षा पारेख ,सुनिल हुले, महादेव हुले, सुनिल बोंबले, डाॅ माणिक बिचकर, सुधाकर शिंदे, संतोष साहु यांचेसह रुपीनगर संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व बहुसंख्य योगसाधक उपस्थित होते.
       पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रास्तावीक किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी धर्मा नवले यांनी केले. सुत्रसंचालन डाॅ नारायण हुले यांनी केले तर आभार प्रदर्शन मृणालीनी कुलकर्णी यांनी केले.
close