shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे पक्ष संघटनात्मक कामासाठी ९ एप्रिल रोजी शिर्डी दौऱ्यावर ...

शिर्डी :-  भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे पक्ष संघटनात्मक कामासाठी ९ एप्रिल रोजी शिर्डी दौऱ्यावर येत आहे अशी माहिती भाजपा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.

       श्री. गोंदकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेश अध्यक्ष झाले नंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत असून उत्तर, दक्षिण व शहर या तीनही संघटन जिल्ह्याची एकत्रित बैठक घेणार आहे.
         या कार्यक्रमास महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार चंद्रशेखर कदम, स्नेहलता कोल्हे, वैभवराव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आदी उपस्थित राहणार आहे.
        श्री. बावनकुळे हे सकाळी ९.३० वाजता समन्वय बैठक घेणार असून १०.३० वा. माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधनार आहे. ११.३० वा. भारतीय जनता युवा मोर्चा मोटार सायकल रॅली ने स्वागत करणार आहे. १२.३० वा. बूथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. १.३०वा. सोशल मीडिया सेल पदाधिकारी यांची बैठक होईल. ३.१५ वा. युवा वॉरियर्स चे उदघाटन करणार आहे. ३.४५ वा. धन्यवाद मोदीजी लाभार्थी यांचे सोबत संवाद करणार आहे. ४.१५ वा. सामाजिक कार्यक्रमात भाग घेणार आहे. ५.१५ वा. बूथ कमिटी ची बैठक घेणार आहे. ५.४५ वा. कोअर कमिटी ची बैठक घेणार आहेत.
      तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन दक्षिण जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हा अध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनिल वाणी, जालिंदर वाकचौरे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीराज् डेरे, महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली नाईकवाडी, किसान मोर्चा अध्यक्ष सतिश कानवडे, ओबिसि मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, आदिवासी आघाडी अध्यक्ष विजय भांगरे, दलित आघाडी अध्यक्ष अशोक लोंढे, अल्पसंख्यक आघाडी अध्यक्ष असिफ पठाण, सोशल मीडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे.
close