कौठळी शाळेत इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.
इयत्ता ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके भेट.
उन्हाळी सुट्टीत अभ्यासाबरोबर विविध छंद जोपासा...यश राऊत(बी आर ओ.... जनरल रीसर्व इंजिनिअर फोर्स )
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १८/४/२०२३ रोजी जि प प्राथ शाळा कौठळी येथील इयत्ता ४ थी मधील विध्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्याचे औचित्य साधून शाळेचा माजी विद्यार्थी यश राऊत रा. कौठळी याची आर्मी मध्ये निवड झालेबद्दल शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ज्याला जे क्षेत्र आवडते त्याने त्या क्षेत्राची माहिती करून घ्या व सुट्टीत वेगवेगळे छंद जोपासा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी शिक्षक व विद्यार्थी नाते यावर मुलांना मार्गदर्शन केले.नंतर भारत ननवरे यांनी मुलांना पूर्व इतिहास सांगून सर्व आठवणी जाग्या केल्या. सरांचे भाषण ऐकताना मुलांच्या व शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. सरांनी मुलांना एक सल्ला दिला काही झाले तरी स्वतःचे,आपल्या शाळेचे व गावाचे नाव सतत उंचवत ठेवायचे.त्याचबरोबर सरांनी मुलांना प्रश्न विचारला तुम्ही सुट्टीत काय काय करणार? यावर विद्यार्थ्यांनी सांगितले की मी वाचन करणार,पोहायला शिकवणार,गाणी-गोष्टी ऐकणार, गोष्टींची पुस्तके वाचणार,खेळ खेळणार, गणिते सोडवणार,पाढे पाठांतर करणार,आईला कामात मदत करणार,गावाला जाणार,फिरायला जाणार इ.नंतर मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मुलांना गोष्टींची पुस्तके भेट देऊन शुभेच्छा दिल्या.सर्व मुलांना शाळेच्या वतीने गोड जेवण देण्यात आले.पहिली पासून आपल्या समोर असणाऱ्या,खेळणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या,कला सादर करणाऱ्या मुलांना निरोप देणे मात्र खूप अवघड जात होते. नंतर विद्यार्थी मनोगते झाली व शेवटी सर्व मुलांना शुभेच्छा देऊन उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कानमंत्र देण्यात आला. या वेळी शाळा व्य समितीचे अध्यक्ष साहेबराव पिसाळ,ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब काळेल,कौठळी सोसायटीचे संचालक प्रमोद चितारे,शाळा व्य समितीचे सदस्य सोमनाथ पाटोळे,अमोल मोरे,अमित मारकड, सदस्या राणी पाटोळे,सोनाली माने,रुपाली पवार,शिलावती गायकवाड, सारिका पाटोळे सह विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन भारत ननवरे यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मानले.

