सामोडे- (दिलीप घरटे प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अध्यात्म व बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणित मार्गाचे साक्री तालुक्यातील पिंपळनेर,सामोडे,दहिवेल,व इतर केंद्र मिळून एकत्रित रित्या सामुदायिक आई भगवतीची सेवा श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन श्री क्षेत्र नागाई येथे शुक्रवार दिनांक ५ मे २०२३ रोजी ठिक दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तरी तालुक्यातील सर्व सेवेकऱ्यांनी या सेवेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आई भगवती चरणी सेवा रुजू करावी असे आवाहन श्री स्वामी समर्थ अध्यात्म व बाल संस्कार केंद्र पिंपळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

