हर्षवर्धन पाटील यांचेकडून रमजान ईद, अक्षय तृतीया व बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा
- तिन्हीं धार्मियांचे एकाच दिवशी उत्सव
इंदापूर : प्रतिनिधी (दि. २२ एप्रिल)
रमजान ईद, अक्षय तृतीया व बसवेश्वर जयंती हे तिन्हीं उत्सव शनिवारी एकाच दिवशी आले आहेत. देशातील नागरिक हे एकमेकांच्या धार्मिक सणांचा मनःपूर्वक आदर करतात, सर्व सण मानवी जीवनाला बंधुत्व आणि शांततेची शिकवण देतात, असे नमूद करीत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला धार्मिक उत्सवानिमित्त शनिवारी (दि. 22) शुभेच्छा दिल्या.
एकाच दिवशी मुस्लिम, हिंदू व लिंगायत या तिन्ही धर्माचे उत्सव सण 2022 प्रमाणे पुन्हा एकाच दिवशी आल्याने आनंदाचा त्रिवेणी संगम झाला आहे. रमजान ईद हा आनंदाचा सण आहे. मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपुर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. संपुर्ण मानवजातीच्या कल्याणा करीता आपले आयुष्य वेचले. त्यांनी मानवजातीचा सन्मान, शांती, समता, बंधुता, सुरक्षित व विकासाचा मार्ग दाखवून दिला आहे, असे गौरवोद्गार व्यक्त करून हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम बंधू-भगिनींना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
हिंदू समाजातील अक्षय तृतीया सण पावन पर्व मानले जाते. वर्षातील साडे-तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. हिंदू समाज हा सण मोठ्या आनंदात व उत्साहाने साजरा करीत आहे. हा दिवस ज्ञान परंपरेचा सुवर्णयुग मानला जातो, असे गौरवोद्गार काढून हर्षवर्धन पटेल यांनी अक्षय तृतीयेच्या हिंदू बंधू-भगिनींना शुभेच्छा व्यक्त केल्या.
संत महात्मा बसवेश्वर यांनी मानवी जीवनाला नवी दिशा दिली. त्यांचा उद्देश हा माणूस घडविण्यावर होता. महात्मा बसवेश्वर यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अध्यात्म, तत्त्वज्ञान, शिक्षण साहित्य अशा विविध क्षेत्रात क्रांतिकारी विचारांची पेरणी केली, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले व लिंगायत समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

