शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
आज शुक्रवार दिनांक 21 4 2013 रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे पालक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे विशेष शिक्षक माननीय श्री दिपक कोकणे सर यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र शिंनगरे प्रमुख पाहुणे सुरेश सानप व सौ आशाताई गीते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व पालकांचे स्वागत केले विद्यालय व वस्तीगृहातील दैनंदिनजीवनक्रमा विषयी श्रीमती नंदा शेळके मॅडम यांनी माहिती दिली.
विद्यालयाचे मानसोपचार तज्ञ माननीय श्री हेमलता पवार मॅडम यांनी दिव्यांगांचे कायदे व योजना याबद्दल माहिती दिली तसेच श्री नासिर देशमुख सर यांनी ऑनलाईन शिक्षणाबाबत माहिती दिली. वैश्विकओळखपत्रका बद्दलचे मार्गदर्शन विद्यालयाचे विशेष शिक्षक माननीय श्री बालाजी हनुमंते सर यांनी दिली सर्टिफिकेटची नोंदणी व रिन्यूअल बाबतची माहिती श्री ओमप्रकाश खताळ सर यांनी दिली तसेच आरोग्य विषयी परिचारिका माननीय श्रीमती सुनंदा सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
तसेच माननीय श्री वाकचौरे मंगेश सरांनी पालकांच्या शंका निरसन केल्या तसेच द्वितीय सत्र प्रगती अहवाल देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

