आमदार पाचपुते यांनी आयुष्यभर लबाडी करूनच निवडणुका केल्या: शेलार यांचा घणाघात
नगर :- श्रीगोंदा मतदारसंघात माझा खुप कमी मताने पराभव झाला तरी मी थांबलो नाही. मात्र इथले आमदार बबनराव पाचपुते मतदारांना लबाड बोलून निवडूण आले. पण ते चार वर्षात कोठेही फिरले नाही. कोणाच्या सुख दुःखात सहभागी झाले नाही. विकासकामे केली नाहीत. आमदार पाचपुते यांनी आयुष्यभर लबाडी करूनच निवडणुका केल्या असा घणाघात राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे उपाध्यक्ष घनःश्याम शेलार यांनी यावेळी केला.
भातोडी येथे आज रविवारी सकाळी शेलार यांची परीवर्तन जनसंवाद यात्रा पोहचली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. व छोटीसी सभा आयोजीत केली होती. त्यावेळी शेलार बोलत होते.
या यात्रेमध्ये नागरदेवळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, काँगेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संपत म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डीले, सभापती संदीप गुंड, ठाकरे गटाचे तालुका प्रमूख राजेन्द्र भगत, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रकाश पोटे, चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार, भातोडी सरपंच विक्रम लबडे, उपसरंच राजू पटेल, विठ्ठल कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अल्प संख्याक सेल चे तालुका अध्यक्ष पापामिया पटेल, उप तालुका प्रमुख निसार शेख, शिवसेना शाखप्रमुख भाऊसाहेब धलपे, ग्रामपंचात सदस्य कैलास गांगर्डे, सिराज पटेल, शाकीर मुलाणी, सोसायटी चेअरमन शिवराम लबडे, रफिक पटेल, पांडू पटेल, घनश्याम लबडे, अशोक तरटे, आदिनाथ शिंदे, अमोल कदम, अशोक कदम, बाबसाहेब नेटके, गणेश गायकवाड, घनःश्याम राऊत, बाबा पटेल, विलास लबडे, आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.
शेलार यांनी गावातील अनेक प्रश्न जाणवून घेतले आणि सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना शाखा, चांदशहावली शाखेच्या वतीने शेलार यांचा सत्कार करण्यात आला. झोडगे यांनी गटातील केलेल्या कामांचा आढावा दिला. तसेच म्हस्के, गुंड, शेख, शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

