shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पळसदेव ग्रामपंचायतीवर पळसदेव ग्रामविकास आघाडीची सत्ता.

पळसदेव ग्रामपंचायतीवर पळसदेव ग्रामविकास  आघाडीची सत्ता. 

 सरपंचपदी आजिनाथ भगवान पवार यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: पळसदेव गावच्या सरपंच पदाचा इंद्रायणी मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी दिनांक १७ एप्रिल रोजी निवडणूक कार्यक्रम पार पडला यामध्ये गुप्त मतदान पद्धतीने मतदान होऊन आजिनाथ भगवान मोरे यांना ८ व अंजना बनसोडे यांना ७ मते मिळाली यामध्ये अजिनाथ पवार यांचा विजय झाला.

दरम्यान सरपंच पदाची निवडणूक लागल्यानंतर सत्ताधारी व विरोधी गटातील सदस्य एकत्र होऊन पळसदेव ग्रामविकास आघाडीची स्थापना करून सरपंच पदाचा उमेदवार आजिनाथ पवार यांना निवडून आणले.
या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीने पळसदेव ग्रामविकास आघाडी सत्ता खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले. या पॅनल मध्ये मेघराज कुचेकर, भूषण काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र बांडे ,स्वप्निल काळे, दिपाली काळे, कविता शिंदे, अंकुश जाधव, भूषण काळे, सोनाली कुचेकर ,कविता शिंदे यासह महेंद्र काळे ,विकास शिंदे ,सतीश मोरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यावेळी हरी काटकर  यांनी कामकाज पाहिले. यावेळी तलाठी महेश मेटे ग्रामपंचायत कोतवाल गणेश सोनवणे पोलीस पाटील अनिल कुचेकर उपस्थित होते.
close