shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत पडस्थळचा शौर्य संभाजी रेडके ७ वा.

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत पडस्थळचा शौर्य संभाजी रेडके ७ वा.

जि.प. प्राथमिक शाळा पडस्थळ  या शाळेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत .
इंदापूर प्रतिनिधी : विद्यार्थी विकास फाउंडेशन, सातारा द्वारा आयोजित राज्यस्तरीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले होते. संपूर्ण राज्यातून 76,000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. एकूण 190 केंद्रावर ही परीक्षा पार पडली. इयत्ता पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता.
राज्य गुणवत्ता यादी, जिल्हा गुणवत्ता यादी व केंद्र गुणवत्ता यादी अशा तीन विभागात विद्यार्थ्यांना गुणानुक्रमांक विभागून देण्यात आले. यामधे जि.प. प्राथमिक शाळा पडस्थळ ता.इंदापूर जि. पुणे या शाळेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत अव्वल आले, शौर्य संभाजी रेडके राज्यात सातवा आला, यश गणेश गव्हाणे, हर्ष लक्ष्मण रेडके, सत्यजित विशाल मारकड, श्रीतेज राहुल मारकड या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक मिळविला. समर्थ औदुंबर काळे हा केंद्रात प्रथम आला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव व सहशिक्षक सुरेश घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी याचा खूप फायदा होणार आहे. पडस्थळ ग्रामस्थांतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
येत्या 16 एप्रिल 2023 रोजी सातारा येथे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर , सातारचे खासदार श्रीनिवास पाटील व प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना रोख रक्कम व राज्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, जिल्हा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, व केंद्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असा बहुमान दिला जाणार आहे. त्याच सोबत सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे.
close