अजिजभाई शेख
राहता - शहरातील चितळी रोड हा आत्यंत वर्दळीचाचा असून या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात नेहमीच ये जा चालू असते. तसेच सदर रोडला दोन मंगल कार्यालय, दूध डेअरी व मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट ऑफिस असल्यामुळे येथे मोठ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असल्या कारणाने सतत छोटे-मोठे अपघात हे सातत्याने घडतच असतात, त्यामुळे याठिकाणी गतीरोधकची अत्यंत गरज असून तातडीने सदरील महत्वाच्या दोन ठिकाणी गतीरोधक बसवण्यात यावे अशी राहाता शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे.
राहाता सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उपविभागीय अभियंता श्री.गुंजाळ यांना राहाता शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.नंदकुमार सदाफळ यांच्या हस्ते सदरील निवेदन देण्यात आले असून त्यात चितळीरोडवरील साई विठ्ठला लॉंस जवळ आणि म्हसोबा मंदिराजवळ अशा दोन ठिकाणी गतीरोधक बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावर सदर निवेदनाची दाखल घेत हे काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत असल्याचे अभियंता श्री. गुंजाळ यांनी सांगितले.
याप्रसंगी राहाता राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष गुलशेर शेख, माजी नगरसेवक निवृत्ती गाडेकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शाह मुश्ताकअली यांच्या समवेत, इंजि.जाधव साहेब, कॉन्ट्रॅक्टर बेंद्रे साहेब व अधिकारी उपस्थित होते.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

