केज तालुक्यात काल आलेल्या अस्मानी संकटाने केज तालुक्यातील अनेक गावामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकदम झालेल्या अवकाळी गारपेटीने , अवकाळी पावसाने तसेच सुसाट वारा व विजेच्या कडकडाट सह पडलेल्या विजेने पशुधन मृत पावल्याने नुकसान तर झाले आहेच परंतु फळबागा अशरक्ष कोलमडून गेल्या आहेत.
शेतकऱ्यांचे हताशी आलेले टरबूज ,खरबूज ,अंबा, झेंडू,सिमला मिर्ची, भाजीपाला , ज्वारी,गहू व अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
अशा या संकटाच्या संमयी केज मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा बळिराज्याच्या पाठिशी धाऊन आल्या आहेत. कालच त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार केज यांना झालेल्या प्रचंड नुकसान नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी काल झालेल्या अवकाळी गारपेटीने नुकसान झालेल्या पिकांचे तसेच पशुधनाचे पंचनामे करण्याच्या सूचना सर्व तलाठी, गिरधावर, कृषी अधिकारी यांना दिल्या होत्या.
त्यामुळे तहसीलदार दुलाजी मेंढके साहेब , गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे व तालुका कृषी अधिकारी ,तसेच कृषी अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून घेतले आहेत. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याने शासन नियमानुसार आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेतकऱ्यांच्या पाठिशी तात्काळ धाऊन मदत मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या आमदार नमिता अक्षय मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा व अक्षय मुंदडा यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

