shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांना सोडायला आली आमदारांची गाडी... विद्यार्थ्यांच्याे चेहऱ्यावरील आनंद मन सुखावणारा - आमदार दत्तात्रय भरणे.

विद्यार्थ्यांना सोडायला आली आमदारांची गाडी...
 
 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मन सुखावणारा  - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी : आज लासूर्णे येथील श्री. निलकंटेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी थेट तालुक्याचे आमदार दत्तात्रय  भरणे स्वतः गाडीत बसून आले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी भेटी देत होते. यावेळी लासूर्णे येथे काही विद्यार्थी थांबलेले दिसले. यावेळी त्वरित गाडी थांबवत आमदार दत्तात्रय  भरणे यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांना कुठे जायचे आहे याची चौकशी केली व विद्यार्थ्यांना घेऊन गाडी थेट अंथुर्णे गावामध्ये पोहोचली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मन सुखावणारा असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यानी सांगितले.
close