shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मकाई सह.साखर कारखान्याची निवडणूक जाहीर ...16 जुनला मतदान होणार



प्रतिनिधी : सचिन जव्हेरी

करमाळा : १२ /  करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन 16 जुनला मतदान होणार तर 18 जुनला निकाल जाहिर होणार आहे .

मकाईच्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय गटांनी दंड थोपटले असून या निवडणूक आखाड्यात आता कोण ठरणार मकाईचा कारभारी याची उत्सुकता करमाळा तालुक्यातील जनतेला लागली आहे. 

सदर निवडणूक 5 गटांतून 11 तर इतर पाच गटांतून 6 अशा एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोणपे यांनी दिली आहे.

यामध्ये ऊस उत्पादक गट भिलारवाडी- 2 जागा
पारेवाडी गट- 3 जागा
चिखलठाण गट- 2 जागा
वांगी गट- 2 जागा
मांगी गट – 2 जागा

राखीव मतदार संघामध्ये
बिगर उत्पादक सहकारी व पणन संस्था – 1 जागा
महिला राखीव- 2 जागा
अनुसूचित जाती – 2 जागा
मागासवर्गीय – 1 जागा
भटक्या विमुक्त – 1 एक जागा
अशा 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीसाठी दि. 12 ते 18 मे, सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरता येणार आहेत. 19 मे रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन 22 मे रोजी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रसिद्ध करण्यात येईल.

दि. 22 मे ते 5 जून या कालावधीत 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी असणार आहे. 6 जून रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 16 जूनला मतदान झाल्यानंतर 18 जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे .

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मिळालेल्या माहितीनुसार एकूण १६ हजार ८६४ मतदारथ आहेत. यामध्ये व्यक्ती मतदार १६ हजार ८५८ आहेत. तर संस्था मतदार ६ आहेत. १७ संचालकांसाठी येथे निवडणूक होत आहे. सहा मतदारसंघातून ही निवडणूक होणार असून ऊस उत्पादक सभासदांमधून पाच गटातून ११ संचालक निवडून द्यायचे आहेत.
close