छत्रपती संभाजीराजे केसरी तनपुरेवाडी व्याहळी चांदीच्या गदेचा मानकरी ठरला कौठळीचा
पै. भैय्या पिसाळ.
कुस्ती मैदानस इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे , मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा .
तनपुरेवाडी व्याहाळी यथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पडले पार.
इंदापूर प्रतिनिधी: व्याहाळी(ता - इंदापूर) तनपुरेवाडी व्याहाळी यथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान तनपुरवाडी व्याहळी ग्रामस्थ ,आप्पासाहेब तनपुरे व त्यांचे सहकारी मित्र परिवार यांच्या तर्फे (ता.१२)आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बापूराव जाधव सर यांच्या तर्फे केतकेश्वर तालीम निमगाव केतकी येथील कौठळीचा पै. भैय्या पिसाळ व पैलवान गोरख जाधव कोल्हापूर यांच्या कुस्तीसाठी चांदीची गदा ठेवण्यात आली. त्या अटीतटीच्या कुस्तीमध्ये पै . भैय्या पिसाळ विजयी ठरला. आणि छत्रपती संभाजीराजे केसरीचा चांदीच्या गदेचा
मानकरी ठरला . ही मानाची चांदीची गदा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दीपक जाधव व कॉन्ट्रॅक्टर अप्पासाहेब तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी वस्ताद पै .अशोक चोरमले ,श्रावण चोरमले ,पै. दशरथ चोरमले, पै. बळी माने ,पै. शशिकांत सोनार वस्ताद ,पै. बनकर वस्ताद .या कुस्ती मैदानचे पंच म्हणून होते.तर नियोजन पै . रामचंद्र जाधव, पै . संतोष नाना पिसाळ, पै . दादा पाटील, पै . असलम मुलानी, पै . नवा तरंगे यांनी केले .
या कुस्ती मैदानस इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे , मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या .या आखाड्याचे कुस्ती निवेदक म्हणून पै. प्रविण ठवरे सर व पै .संतोष गदादे सर यांनी योगदान दिले
प्रत्येक विजेत्या पैलवानांना कै .आप्पासाहेब तुकाराम ननवरे यांच्या स्मरणार्थ ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले .तर
आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, वस्ताद मंडळी यांचा येथोचित्त सन्मान तनपुरवडी ग्रामस्थ यांच्यातर्फे करण्यात आला .

