shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यामुळे साठ कोटी निधी मंजूर - - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर


प्रतिनिधी : सचिन जव्हेरी

करमाळा : २८ /   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्चमध्ये चारीच्या कामासाठी ६० कोटी रुपये निधी मंजूर झाला. हे काम पूर्ण झाल्याने लवकरच तालुक्यातील ५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहीती पत्रकारांशी बोलताना खा.नाईक निंबाळकर यांनी दिली.

 लोकार्पणसाठी सज्ज झालेल्या करमाळा तालुक्यातील पोंधवडी-वंजारवाडी चारीच्या कामाच्या पहाणी करिता आले असता पत्रकारांनी त्यांचेशी बातचीत केली त्यावेळी ते बोलत होते. या चारीच्या कामासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जास्त जोर लावून पाठपुरावा केला होता. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे,महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव,वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, करंजेचे सरपंच काकासाहेब सरडे,संजय घोरपडे,जयंत काळे पाटील,गणेश गोसावी, महादेव गोसावी, बाळासाहेब कुंभार,तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, वंजारवाडी सरपंच प्रवीण बिनवडे, विहाळचे सरपंच मोहन मारकड, अंजनडोहचे  सरपंच अरुण शेळके, मोरवड सरपंच रामभाऊ कुदळे, पोंधवडी सरपंच येडे ,जातेगाव सरपंच ससाणे, पोथरे गावचे नितीन झिंजाडे, डीसीसी माजी संचालक भर्तरीनाथ अभंग, भाऊसाहेब शिंदे,यांसह चारीचा लाभ मिळणारे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. 

      यावेळी पुढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले की,31 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत या कामासाठी निधी देण्याचे ठरले होते. जुलै महिन्यात या चारीत पाणी सोडण्यात येणार असताना केवळ शेतकरी बांधवांच्या मागणीसाठी येत्या सात दिवसांत तीन दिवसासाठी पाणी सोडण्याच्या सूचनाही आम्ही संबंधीत अधिकार्यांना दिल्या असल्याने प्रायोगिक तत्त्वावर हे पाणी या चारीत आपल्याला पहावयास मिळणार आहे.असे शेवटी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. 

भैरवनाथ कारखान्याकडून येळे वस्तीवरून पोंधवडीकडे गेलेल्या या चारीत कुकडीचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे.यासाठीचे आवश्यक कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आग्रही पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास गेलेले आहे.अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर      या चारीच्या पाण्यामुळे येथील शेतकर्यांच्या चेहर्‍यावर हासु पहायला मिळणार आहे - - -
भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे
close