shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक महाविद्यालयाचा माजी कब्बडी खेळाडू इनामदार याची भारतीय कबड्डी संघात निवड..!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील अशोक कारखाना संलग्न माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील अशोकनगर येथील अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व कब्बडीपटू अस्लम इनामदार याची आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

इनामदार हा तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवाशी आहे. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण अशोकनगर येथील महाविद्यालयात झाले. या काळात त्याने महाविद्यालयाच्या संघाकडून खेळताना अनेक स्पर्धा गाजविल्या. नुकतीच त्याची बुसान (कोरिया) येथे होणाऱ्या आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली.
        या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, मुळा-प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, कारखाना संचालक मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक संतोष देवकर, प्र.प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुयोग थोरात, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, आय.टी.आय. चे प्राचार्य रईस शेख, अशोक इं.मि.स्कूलचे प्राचार्य संपतराव देसाई, तसेच अध्यापक वर्गाने अस्लम ईनामदार याचे अभिनंदन केले आहे.


 समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर




close